प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरात सोमवारी भर दुपारी 12 च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सकाळ पासुन उन्हाचा तडाखा जाणवत असताना अचानक दुपारच्या सुमारास काही वेळ दमदार पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. सध्या मान्सून जरी काही दिवस लांबला तरी सातारा शहरात मात्र अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. सध्या लॉकडाऊन मुळे रस्ते ओस पडले आहेत, तरी अत्यावश्यक सेवा बजाविणाऱयांची मात्र अचानक पडलेल्या या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. केवळ 10 ते 15 मिनीटे पडलेल्या या पावसामुळे रस्ते मात्र चांगलेच धुवुन निघाले. या पावसामुळे महिलावर्गांची चांगलीच तारांबळ उडाली कारण सरकाळच्या दरम्यान उन्हाचा तडाखा चांगला असल्याने वाळवनीचे साहित्य घालण्यात आले होते.