मोरजी /प्रतिनिधी
कोविड-१९ च्या काळात सामाजिक अंतर राखता यावे यासाठी भर रस्त्यात स्तलांतारित करण्यात आलेल्या चोपडे मासळी बाजार अपघातास निमंत्रण ठरत असल्याने तो बंद करावा अन्यथा चोपडे मार्केटच्या जागेत स्थलांतारित करण्यात यावा अशी मागणी नागरिक व वाहन चालकाकडून करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी चोपडे हमरस्त्यावर भरणारा मासळी बाजार डोकेदुखी ठरत असून या ठिकाणी रस्त्यावरच मोठ्याप्रमाणात मासळी विक्रेते बसतात मासळी घेवून येणार्या गाडय़ा रस्त्यावरच ठेवतात. तसेच ग्राहकहि आपल्या दुचाकी ,चारचाकी गाडय़ा भर रस्यात पार्क करून मासळी खरेदी साठी जातात त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो या रस्त्यावरून येणार्या जाणार्या वाहनाना त्याचा मोठ्याप्रमाणात अडथळा होतो.त्यामुळे सामाजिक अंतराचे आधीच तीनतेरा वाजलेला हा बाजार भर रस्त्यात भरत असल्याने आता अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे याविषयी आगरवाडा – चोपडे पंचायतीने गांभीर्य पूर्वक पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा अशी येथील नागरिकांची आग्रहि मागणी आहे तसेच पेडण्याचे उपजिल्हाधिकारी श्री निपाणीकर यांनी या जागेची पाहणी करून रस्त्यावरच भरणारा हा बाजार मासळी मार्केटच्या जागेत हलवण्यास आगरवाडा–चोपडे पंचायतीला भाग पाडावे अशी मागणी करण्यात येत आहे
दरम्यान शिवोली येथील समर्थ संघटनेने शिवोली येथे रस्त्यावर भरणारा बाजार बंद केला आहे तसेच परगावातून येणार्या मासळी विकेत्यांना शिवोलीत येण्यास बंदी घातली होती मात्र शिवोलीतील मासळी विक्रेते चोपडे मार्केट मध्ये गर्दी करतात त्यामुळे या बाजारात येणार्या मासळी विक्रेत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे सुमारे अर्ध्या कि.मी अंतरावर मासळी विक्रेते ठाण मांडून बसतात त्यामुळे चोपडे – शिवोली पुलापासून सुरु होणारा यामासळी बाजारातील मासळी विक्रेते मोठ्या प्रमाणात रस्ता अडवून बसत असतात तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने डरस्ता विभाग]लक्ष घालून रस्त्यावर भरणारा हा बाजार बंद करावा त्यासाठी पेडणे पोलिसांनी सायंकाळच्या वेळी याठिकाणी फक्त वाहन चालकांना दंड ठोठावण्यासाठी उभे राहू नये तर या ठिकाणच्या वाहतुकीवर तसेच मासळी विक्रेते व ग्राहक यांच्या बेशिस्ती वर नियंत्रण ठेवावे अशीहि मागणी होत आहे