- 76 जणांना सुरक्षित स्थळी हलविले
ऑनलाईन टीम / मुंबई :
भांडुप येथील ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला काल रात्री लागलेली आग तब्बल 11 तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असून अजूनही आग आटोक्यात आलेली नाही. आगीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत माहिती देताना उपायुक्त प्रशांत कदम म्हणाले की, ही आग प्रथमतः पहिल्या मजल्यावर लागली आणि ती वाढत जाऊन वरच्या रुग्णालयापर्यंत पोहचली. रुग्णालयात आग लागली तेव्हा तेथे 76 रुग्ण होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन शिड्यांच्या मदतीने खाली काढले. लेव्हल 3-4 ची ही आग असल्याने 23 अग्नीशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी मॉलमध्ये रुग्णालय कसे केले गेले या बद्दल महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले असून या बाबत चौकशी होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे यांनी सांगितले. 70 पेक्षा अधिक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहेे. अजूनही बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बचाव कार्य संपल्यानंतर ही आग कशी लागली याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले आहे.