प्रतिनिधी /बेळगाव
भाग्यनगर दुसरा क्रॉस येथे एका खुल्या खासगी जागेत परिसरातील कचरा आणुन जमा केला जात आहे. महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी जमा केलेला कचरा वाहनातून या ठिकाणी आणुन टाकत आहेत. या कचऱयाची वेळेत उचल केली जात नसल्यामुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत. आधिच हवामान बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असताना दुर्गंधी व डासांमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.
दुसरा क्रॉस आर्य निवास चाळीसमोर खासगी खुल्या जागेत महानगरपालिकेची वाहने लावण्यात येत होती. त्यानंतर या ठिकाणी परिसरातील कचरा आणुन जमा केला जात होता. एका वाहनातून दुसऱया वाहनामध्ये कचरा भरण्याचे काम येथे करण्यात येते. परंतु मागील काही दिवसांपासून वाहनांमधून आणलेला कचरा स्वच्छता कर्मचारी याठिकाणी टाकत आहेत. त्यानंतर तो मोठय़ा वाहनांमध्ये भरून डंपिंग ग्राऊंडपर्यंत नेण्यात येत आहे. परंतु बऱयाचवेळा टाकलेल्या कचऱयाची त्वरित उचल केली जात नसल्याने समस्या निर्माण होत आहे.
या परिसरात अनेक रहिवासी वसाहती, कार्यालये, लहान दुकाने आहेत. परंतु येथील नागरिकांना या कचऱयाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. टाकण्यात आलेला कचरा भटकी कुत्री आणून इतरत्र फेकत आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले असून, या ठिकाणी कचरा जमा करणे बंद करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.