केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या लोकांचे कल्याण करण्याऐवजी केवळ आपल्या भाच्याचे कल्याण करण्याचा अजेंडा आखला आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत त्यांच्यासोबत कुणीच उरणार नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी एका सभेत केली.
या भाच्याला राज्याचा पुढील मुख्यमंत्री बनवणे हा तृणमूल काँग्रेसचा अजेंडा आहे, असेही शहा म्हणाले. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडण्याची जणू लाट आली आहे, असे सांगून शहा म्हणाले, तृणमूलची ‘माँ, माटी, मानुष’ ही घोषणा आता ‘हुकूमशाही, खंडणीबाजी आणि तुष्टीकरण’ अशी झाली आहे, असा घणाघात शहा यांनी केला आहे.