‘कोल्हापूर उत्तर’ भाजप जिंकेल; प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम व प्रदेश कार्यकारीणी सदस्य महेश जाधव यांची नावे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठविली आहेत. यातील एक नाव आज, शनिवारी जाहीर होईल. सत्यजित कदम यांच्या नावाला सर्वांची पसंती असून वर सर्वांचे एकमत आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच कोल्हापूर उत्तर मतदारसंघ भाजपाच जिंकेल असा विश्वास व्यक्त करत ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.