विश्वजीत दास यांनी केले पक्षांतर
वृत्तसंस्था / कोलकाता
मार्च-एप्रिलमध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने तृणमूल काँग्रेसला मोठे खिंडार पाडले होते. तेव्हा तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील होत होते. पण निवडणुकीत तृणमूलच्या मोठय़ा विजयानंतर आता स्थिती पालटली आहे. बागदाचे भाजप आमदार विश्वजीत दास यांनी मंगळवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर सोमवारीच भाजप आमदार तन्मय घोष स्वतःच्या जुन्या पक्षात परतले होते.
भाजपमध्ये अत्यंत अस्वस्थ झालो होतो आणि दीर्घकाळापासून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छित होतो, भाजपने पश्चिम बंगालसाठी काहीच केलेले नाही, असे दास यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होणारे दास हे भाजपचे तिसरे आमदार ठरले आहेत.
तृणमूलकडून दोनवेळा आमदार राहिलेल्या दास यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्यांना बागदा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. तृणमूल महासचिव पार्थ चटर्जी यांच्या उपस्थितीत दास यांनी मंगळवारी पक्षप्रवेश केला आहे.