प्रतिनिधी/ म्हापसा
काल संपन्न झालेल्या अधिवेशनात पाहिलेले आहे. या भ्रष्टाचारी भाजपा सरकारात कायदे अन्य काही करायला पाहिजे त्या सर्व तांत्रिक बाबी बाजूला ठेवून कशा प्रकारे लुटता येईल व रस्ता कसा मोकळा होईल यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. लोकायुक्ताची संस्था आहे ती संपविण्यात आली आहे. या निवडणूक वर्षात त्यांना लुट मारायची आहे. अशा या सरकारला पुन्हा सत्तेवर येऊ नये म्हणून आम्ही गोवा फॉरवर्डच्या आमदारांनी देवाकडे माफीही मागितली आहे कारण यापूर्वी ते आमच्यामुळेच सत्तेवर आले आहेत. यापुढे गोवा फॉरवर्ड भाजप बरोबर राज्यात कोणताच संबंध ठेवणार नाही कारण आज ते दिवसेंदिवस राज्यात लुटमार करीत आहेत त्यावरून हे वर्ष निवडणुकीचेच आहे हे स्पष्ट होते. या सरकारबरोबर युती सोडाच आम्ही गोवा फॉरवर्ड पक्ष संबंधही ठेवणार नाही अशी स्पष्ट माहिती गोवा फॉरवर्डचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई यांनी म्हापसा येथे पत्रकार परिषदेत दिली.
म्हापसा येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवानिमित्त दर्शन घेऊन आशीर्वाद घेतल्यावर श्री. सरदेसाई पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार विनोद पालयेकर, हंगामी अध्यक्ष किरण कांदोळकर, आमदार विनोद पालयेकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर, दिपक कळंगुटकर, उपाध्यक्ष दुर्गादास कामत, संतोष कुमार सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजप हे लोकविरोधी आहे. जनतेची काळजी त्यांना नाही. त्यांना कोळसा पाहिजे जो कुणाला नको आहे. असे सरकार गोव्यावर असले म्हणणे गोमंतकीयांना हा शाप आहे. असा शाप पडू देऊ नये आणि आमच्यासाठी तर त्यांना शाप पडू नये हा आम्ही एक संकल्प करण्यासाठी सर्वजण देव बोडगेश्वरकडे आले आहे. आम्ही देवाकडे आशीर्वाद मागितला आहे. आम्ही यापुढे एक टीम गोवा म्हणून पुढे सरणार आहोत. जे कुणी शक्ती आहे जे भ्रष्टाचारी सरकारला घरी पाठवू पाहत आहे त्यांना आम्ही भेटणार आहोत. विधानसभेच्या बाहेरही आम्ही हे करणार आहोत. टीम गोवा भाजप सेव गोवा म्हणून आम्ही यापुढे भाजप विरुद्ध जाणार आहो असे सरदेसाई म्हणाले.
कायदे बदलून राज्यात लुटमार
राज्याच्या इतिहासातच नव्हे तर देशाच्या इतिहासात असे कायदे राज्यात भाजप सरकारने बदलले आहे. ही मस्करी चालली असून पेंडोमिकच्या नावे सरकारला लॉटरी लागली असून सरकार लुटमीर करीत आहे असा आरोपयावेळी सरदेसाई यांनी केला. जमतेला मारून हे सरकार पुढे चालले आहे हे एक शाम असून त्यांना साथ दिल्यास आम्हालला ते लागू शकतात. गोव्याच्या जनतेला आम्ही सर्व समविचारी एकत्रित येऊन भाजप विरोधातटीम गोवा म्हणून आवाज उठवायला हवा आहे. भाजप जिंदाल, अडानी यांच्यापाठिंब्याने राज्यात उभई आहे. नागरिकांनी यासाठी एकत्रित येणे गोव्यातील हिताचे असेल. ज्या कुणाला वा सर्वांना भाजपा विरोधात लढायचे असेल त्यांनी आम्हाला साथ द्यावी असे श्री. सरेदसाई यांनी सांगितले. सर्वांनी या विरोधात लढा द्यायला हवा.
400 कोटी मेगावेट प्रकल्पास प्रखर विरोध- किरण कांदोळकर
गोवा टर्मिनल ट्रान्समिशन प्रोजॅक्ट लिमिटेड हा प्रकल्प येतो. यासाठी मेळावलीमध्ये मोठय़ा प्रमणात गोंधळ निर्माण झाला. हा मोलेपुरती नव्हे तर तो 400 केव्ही मगावेट प्रकल्प हा आल्यावर आमोणे, मये खोर्जुवे, हळदोणा, मेळावली ही लाईन कर्नाटककडून येऊन थिवी व कोलवाळ येते. यात अर्धे थिवी संपते. मी हळदोणा, खोर्जुवे, थिवी, कोलवाळ या गावात हा प्रकल्प कदापी आणू देणार नाही. किरण कांदोळकर व गोवा फॉरवर्डचा याला प्रखर विरोध आहे अशी माहिती कांदोळकर यांनी दिली. यामुळे रोगराई व सर्वत्र त्रास होईल. सरकारने लाईन आणावी, आमचा विरोध नाही, पूर्वी आणली त्याच ठिकाणाहून आणावी असे ते म्हणाले. अन्य वीज प्रकल्पाची गरज काय. 40 केव्ही प्रकल्पास आमचा प्रखर विरोध असल्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी स्पष्ट केले.
घोटाळे झाकण्यासाठी भाजप काहीही करण्यास तयार
सरकारने आपल्या कारकीर्दीत अनेक भानगडी घोटाळे केले आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा विधीमंडळात राहायला हवे. अन्यथा त्यां पोलीस कोठडीत जावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा निवडून येण्यासाठी ते कोणत्याही थरावर जाण्यास तयार आहेत. ते आम्हाला विभाजन करण्यात काहीही करणार त्याउलट आम्ही एकत्रित राहण्यासाठी सर्व काही केले पाहिजे. काँग्रेसना जे काही करायला पाहिजे ते त्यांनी त्वरित कारवे. जनता कुणासाठी थांबत नाही त्यात नवीन पक्ष तयार होत आहे. त्यांचा रिमोट कंट्रोल कुठे आहे तो सर्व जनतेला माहीत आहे असे श्री. सरदेसाई म्हणाले.
बॉक्स करणे
गोवा फॉरवर्ड पक्ष मोपा वासियांबरोबर
मोपात 1 कोटी जमीन संपादन करून 40 लाखाचा विमानतळ येतो. अतिरिक्त जमीन संपादन केली तरी ती परत येत आहे. असे दिसते की सर्व विमानतळ देशात अडानी बांधतात. मोपातही जमीन बँक तयार करून अडानीला द्यावी असा राज्य सरकारचा विचार आहे. याची सुपारी भाजपने घेतली. या सरकाराविरोधात गोवा फॉरवर्ड मोपा नागरिकांबरोबर आहे अशी माहिती यावेळी विजय सरदेसाई यांनी दिली.