बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील भाजपचे खासदार बीएन बाचेगौडा यांचा पुत्र शरद बाचेगौडा यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. दरम्यान १८ फेब्रुवारी रोजी आमदार शरद यांनी आपण लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हंटले होते.
दरम्यान केएससीसी अध्यक्ष डीके शिवकुमार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत गुरुवारी होसकोटेचे अपक्ष आमदार शरथ बाचेगौडा औपचारिकरित्या कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. स्वतंत्र आमदाराला कोणत्याही पक्षात येण्याची कायदेशीर तरतूद नसल्याने शरथ कॉंग्रेसमध्ये ‘सहयोगी सदस्य’ म्हणून सामील होतील, तर त्यांचे समर्थक व अनुयायी पक्षाचे सदस्यत्व घेतील, असे शिवकुमार म्हणाले.
त्यांचे वडील बी.एन. बाचेगौडा हे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून चिक्कबळ्ळापूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असतानाही शरद यांचे कॉंग्रेसला समर्थन आहे. भाजपाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिल्यानंतर शरथ यांनी २०१९ मध्ये होसकोटे मतदार संघातून पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यासाठी शरद यांनी स्वत: भाजपची साथ सोडली.
कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार सोडणाऱ्या एम. टी. बी. नागराज यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता आली. स्वतंत्र आमदारांवर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्यास बंदी असल्याने शरथ कॉंग्रेसमध्ये सहयोगी सदस्य म्हणून सामील होतील. ते पक्षाला अधिकृतपणे पाठिंबा देतील. त्यांचे समर्थक सदस्यत्व घेतील, असे शिवकुमार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.