गोवेकरांच्या आरोग्याशी खेळ. आरोग्याकडे असुरक्षितता बाळगणाऱयांचा पर्दाफाश व्हावा. फलोत्पादन महामंडळाचे नाव वापरण्याचा गुन्हा गंभीर.
डिचोली / प्रतिनिधी

मये डिचोली येथे मंगळवारी रात्री फलोत्पादन महामंडळाचा बनावट परमीट लावून भाजीची वाहतूक करणारी गाडी अडवून ताब्यात घेण्यात आल्यानंतर राज्यातील लोकांच्या आरोग्याशी निगडित अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. फलोत्पादन महामंडळाचे नाव वापरून बनावट परमीट वापरण्याचा प्रकार हा गंभीरच असून यामागचा मास्टरमाइंड कोण, याचा छडा लावण्याचे आव्हान फलोत्पादन महामंडळ व पोलिसांसमोर आहे.
राज्यात सध्या लॉकडाउन सुरू असल्याने फलोत्पादन महामंडळने आपल्या अधिकृत भाजी पुरवठादारांना 30 मार्च रोजी नव्यने परमीट देऊन त्याची मूळ (ओरीजनल) प्रत गाडीच्या दर्शनी आरशाला चिकटविण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे फलोत्पादन महामंडळाच्या गाळय़ांवर भाजीचा पुरवठा करणाऱया भाजी पुरवठादारांनी आपल्या गाडींवर संबंधीत वाहनांचे क्रमांक, चालकांची नावे व महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची सही असलेला परमीट चिकटवून भाजीचा पुरवठा करण्यास प्रारंभ केला होता.
सरकारलाच उल्लू बनविल्याचे स्पष्ट.
मात्र एका भाजी पुरवठादाराला दिलेल्या परमीटची झेरॉक्स प्रत काढून त्यावरील मूळ वाहनाचा क्रमांक नष्ट करून त्याजागी कर्नाटक नोंदणीकृत वाहनाचा क्रमांक हाताने लिहीणे. आणि या बनावट परमीटच्या आधारे गोवा राज्यात फलोत्पादन महामंडळाची भाजी असल्याचे भासवून बेकायदेशीर व्यवसाय करणे. हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकरणाने सरकारलाच कोणीही कशाही पध्दतीने उल्लू बनवू शकतो हे स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रकारामागच्या मास्टरमाइंडचा पर्दाफाश करण्याचे आव्हान.
लॉकडाउन काळात गोव्यात शेजारील बेळगाव येथील बाजारातून येणाऱया भाजीचे प्रमाण बऱयापैकी वाढले आहे. एरव्हीच्या वेळी येणाऱया भाजीच्या गाडय़ांपेक्षा सध्या दुप्पट, तिप्पटीने गाडय़ा गोव्यात येत आहेत. या गाडय़ा गोवा राज्याच्या सीमेवरून कोणत्याही किचकट तपासणीशिवाय सुटाव्यात यासाठी फलोत्पादन महामंडळाचाच बनावट परमीट बनविण्याची नामी शक्कल कोणीतरी लढविली आहे. सरकारच्या अखत्यारीत येणाऱया फलोत्पादन महामंडळाच्या परमीटचा गैरवापर करण्याचे धाडस कोणीही सहजपणे करू शकत नाही. यामागे कोण सूत्रधार आहे याचा शोध लावून त्याला पर्दाफाश करण्याचे आव्हान सरकार व पोलिसांसमोर आहे.
गाडी पकडल्याने प्रकार उघडकीस, अशी कितीतरी प्रकरणे असण्याची शक्मयता.
मये येथे अशोक लेयलंड ही मिनी टेंपो मयेचे उपसरपंच विश्वास चोडणकर यांनी संशयावरून पकडल्याने फलोत्पादन महामंडळाच्या बनावट परमीटचा वापर सर्रासपणे गोमंतकीय जनतेच्या जिवनाशी खेळ करण्यासाठी होत असल्याचे उघडकीस आले. मात्र अशा पध्दतीने कितीतरी वाहने असे फलोत्पादन महामंडळाचे बनावट व माहिती बदललेले परमीट लावून भाजी घेऊन गोवा राज्यात प्रवेश करीत असावे. याकडे कोणाचे कडक लक्ष आहे ? अशा प्रकारचे अनेक प्रकरणे सखोल चौकशी व कुसून तपासणी हाती घेतल्यावर उघडकीस येण्याची शक्मयता आहे. मये गावातच गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे खाडाखोड केलेला आणि माहिती बदललेला फलोत्पादन महामंडळाचा परमीट लावलेली मोठी भाजीची टेंपो आपण पाहिली होती. मात्र त्यावेळी त्यांं®ााr चौकशी करावी असे मला वाटले नव्हते, पण ही दुसरीही गाडी त्याच पध्दतीच्या परमीटसह दिसल्याने आपण संशयाने त्या गाडीची चौकशी केली आणि आपला संशय अखेर खरा ठरला. त्यावरून अशा प्रकारे बनावट परमीट लावून कितीतरी वाहने बेकायदेशीररित्या भाजीचा व्यवसाय करीत असल्याच्या संशयाला दुजोरा मिळतो, अशी माहिती मयेचे उपसरपंच विश्वास चोडणकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
अशा प्रकरणांसाठी गोव्यातून संबंधितांकडून सहकार्य ?
फलोत्पादन महामंडळाच्या परमीटचा सर्रासपणे माहिती बदलून दुरूपयोग करणे हि बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणाने सरकारलाच फसविण्याचा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारची बेकायदेशीर कृत्ये करण्यास गोव्यातील फलोत्पादन महामंडळाशी संलग्नित असलेल्या भाजी पुरवठादार किंवा संबंधितांकडून अशा महाभागांना सहकार्य मिळत आहे की काय ? असा प्रश्न सर्रासपणे निर्माण होत आहे. त्या दृष्टीने महामंडळ व पोलिसांनी चौकशी करून या प्रकरणांत गुंतलेल्यांना समोर आणणे गरजेचे आहे. कारण अशा प्रकारे सरकारी महामंडळाच्या परमीटची बनावट प्रत करून गोमंतकीय जनतेला फसविणे हाही मोठा गुन्हा आहे. यात गुंतलेल्यांचे चेहरे समोर येणे राज्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
कसून चौकशी करण्याचे फलोत्पादन महामंडळातर्फे आदेश.
हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी असे आदेश महामंडळातर्फे देण्यात आलज आहे. तसेच आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशीही चर्चा करून या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. असे महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांटय़े यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. महामंडळाने नेमलेल्या अधिकृत भाजी पुरवठादारांकडून बेळगाव येथील एपीएमसी भाजी बाजारातून गोवा राज्याला दरदिवशी आवश्यक असलेला भाजी माल घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुतला जातो. व त्याची सुरक्षितपणे पेकींग करून गोव्यात आणला जातो. या मालाच्या नियंत्रित दरांबरोबरच लोकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. असे महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांटय़े यांनी सांगितले. तर बनावटगिरी व बेकायदेशीरपणे कोणत्याही शेतकऱयांकडून भाजीमाल घेऊन येणारे भाजी पुरवठादार हे सदर मालाची स्वच्छता आणि सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही. त्यासाठी लोकांनी सावध राहून अशी प्रकरणे समोर आल्यास त्याची माहिती महामंडळाला किंवा आपल्याला वैयक्तीकपणे द्यावी, असज आवाहनही अध्यक्ष प्रवीण झांटय़े यांनी केले आहे.