ऑनलाईन टीम/तरुण भारत
टी २० क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या पराभवाचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या डॉक्टरांविरोधात जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. श्रीनगरच्या सौरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. टी २० सामन्याच्या निमित्ताने क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत प्रथमच पाकिस्तानने भारताचा पराभव केला. “सौरामधल्या एसकेआयएमएस हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या डॉक्टर्सनी घोषणाबाजी आणि फटाके फोडून पाकिस्तानचा विजय साजरा केला” आरोपींना कलम १०५ (अ) आणि आयपीसीच्या कलम ५०५ आणि कलम १३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
डीजी दिलबाग सिंह यांनी याविषयी माहिती देताना “या प्रकरणात आम्ही दोन एफआयआर नोंदवले आहेत. भारत-पाक सामन्यानंतर सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. पण बहुतेक व्हिडीओ जुने आहेत. सरकारी मेडीकल कॉलेजमधला व्हिडीओ नवीन आहे. आम्ही एफआयआर नोंदवला असून कारवाई करण्यात येईल” असे त्यांनी सांगितले.