ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाबाधितांनी 25 लाखाचा टप्पा गाठला आहे. देशात मागील 24 तासात 65 हजार 02 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 996 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 25 लाख 26 हजार 193 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 49 हजार 036 एवढी आहे.
सध्या देशात 6 लाख 68 हजार 220 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 18 लाख 08 हजार 937 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 2 कोटी 85 लाख 63 हजार 056 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 68 हजार 679 रुग्णांची तपासणी शुक्रवारी एका दिवसात करण्यात आली.