ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 89 हजार 706 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 43 लाख 70 हजार 129 वर पोहचली आहे. मृतांचा एकूण संख्या 73 हजार 890 एवढी आहे.
सध्या देशात 8 लाख 97 हजार 394 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 33 लाख 98 हजार 845 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 5 कोटी 18 लाख 04 हजार 677 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 54 हजार 549 रुग्णांची तपासणी मंगळवारी एका दिवसात करण्यात आली.