वृत्तसंस्था/ ओस्लो
येथे सुरू असलेल्या विश्व कुस्ती स्पर्धेत शनिवारी भारताचा मल्ल रविंद्र याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच्या पात्र फेरीच्या लढतीत संपुष्टात आले. या स्पर्धेत भारतीय मल्ल रविंद्रने पहिल्या लढतीत विद्यमान विश्व विजेता मल्ल बेका लोमाडेझला पराभूत केले पण त्यानंतर पुढील लढतीत अमेरिकेच्या डेटॉन फिक्सने रविंद्रला पराभूत केले.
गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या कनिष्ठांच्या विश्व कुस्ती स्पर्धेत 61 किलो वजनगटात रविंद्रने रौप्यपदक पटकाविले होते. नॉर्वेतील ओस्लो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचे यश तुनीर (74 किलो), संदीप मान (86 किलो), अनिरूद्ध (125 किलो) यांना पात्रता फेरी पार करता आली नाही. संदीप मानला कोरियाच्या वेनुकने 5-4 अशा गुणांनी तर अनिरूद्धला इजिप्तच्या युसीफने 9-3 अशा गुणांनी पराभूत केले.