वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला क्रिकेट संघ येत्या सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत भारतीय महिला संघाला केवळ एकमेव मालिका खेळण्याची संधी मिळाली होती.
भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात उभय संघात एकमेव कसोटी, तीन वनडे आणि टी-20 सामने आयोजित केले आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघ तब्बल सात वर्षांनंतर इंग्लंड बरोबर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्याचप्रमाणे येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार असल्याचे संकेत ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन स्कूटने दिले आहेत. या दौऱयाचा कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही. तरीही या दौऱयात भारतीय महिला संघ वनडे आणि टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱयाला सप्टेंबरच्या दुसऱया आठवडय़ात प्रारंभ होईल, असे संकेत मिळाले आहेत. बीसीसीआयच्या झालेल्या कार्यकारी मंडळाच्या यापूर्वीच्या बैठकीमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱयाला अधिकृत मान्यता देण्यात आली होती. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा घेतली जाणार असून या स्पर्धेपूर्वी भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाचा दौरा सरावाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे.