नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय नौकानयनपटू अर्जुन लाल जाट व अरविंद सिंग यांनी ऑलिम्पिकसाठी पात्रता संपादन केली. पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्स इव्हेंटमधून ते आता भारताचे प्रतिनिधीत्व करतील. शुक्रवारी आशिया-ओशेनिया कॉन्टिनेंटल गटातील फायनलमध्ये या जोडीने दुसरे स्थान संपादन केले. त्यानंतर त्यांच्या ऑलिम्पिक सहभागावर शिक्कामोर्तब झाले. या इव्हेंटमध्ये आणखी एक भारतीय जाकर खान पुरुष गटात चौथा आला. मात्र, प्रत्येक देशाला एका इव्हेंटमध्ये एकच प्रतिनिधीत्व मिळत असल्याने त्याची संधी हुकली.
‘या गटात एका देशाची केवळ एकच बोट सहभागी होऊ शकते. अरुण लाल जाट व अरविंद सिंग यांनी पुरुष लाईटवेट डबल स्कल्स गटात दुसरे स्थान संपादन केले. त्यामुळे, ते पात्र ठरतात. दुसरीकडे, जाकरला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले असल्याने तो पात्र ठरत नाही’, असे भारतीय नौकानयन संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी सिंग देव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.