ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतीय सागरी हद्दीत शिरलेल्या दहा पाकिस्तानी नागरिकांना तटरक्षक दलानं पकडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिक ‘यासीन’ नावाच्या बोटीसह अरबी समुद्रातील भारतीय सागरी हद्दीत शिरले होते. काल रात्री (8 जानेवारी) एक ऑपरेशन राबवून तटरक्षक दलाने ही मोठी कारवाई केली आहे. यावेळी सुरक्षा दलाने एक पाकिस्तानी बोटही ताब्यात घेतली आहे. संबंधित सर्वांना चौकशीसाठी पोरबंदर याठिकाणी आणण्यात आलं आहे. संबंधित नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी बोट भारतीय पाण्यात सहा ते सात मैल आत घुसली होती. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाज पाहताच पाकिस्तानी बोट पळ काढू लागली होती, मात्र त्यानंतर तटरक्षक दलाने कारवाई करत बोट पकडली. बोटीतून आतापर्यंत दोन टन मासे आणि ६०० लिटर इंधन जप्त करण्यात आले आहे. पोरबंदरला पोहोचल्यानंतर पुढील चौकशी केली जाईल