आकाशात गरजले राफेल-जग्वार : मैत्रीच्या प्रवासाठी अंतर केवळ कसोटी

वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत आणि फ्रान्सच्या वायुदलांदरम्यान संयुक्त युद्धाभ्यास सुरू आहे. फ्रान्समध्ये होत असलेल्या या युद्धाभ्यासाला ‘डेझर्ट नाइट 2’ नाव देण्यात आले आहे. भारत आणि फ्रान्सच्या वायुदलाच्या विमानांनी गुरुवारी फ्रान्सच्या पश्चिम समुद्र किनाऱयावर लार्ज फोर्स एंगेजमेंट एक्सरसाइजमध्ये भाग घेतला आहे.
या युद्धाभ्यासत प्रेंच वायुदलाच्या मिराज-200 आणि राफेल विमानांनी भाग घेतला. तर भारतीय वायुदलाच्या वतीने सुखोई 30 आणि जग्वार लढाऊ विमान सामील झाले. दोन्ही देशांच्या मैत्रीच्या प्रवासासाठी हे अंतर केवळ कसोटी आहे. युद्धाभ्यासाचा उद्देश दोन्ही देशांची मैत्री आणि परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे असल्याचे भारतीय वायुदलाने ट्विट करत सांगितले आहे.
13 दिवसांचा युद्धाभ्यास
भारत आणि फ्रान्सच्या सैन्यांदरम्यान सातत्याने युद्धाभ्यास सुरू आहे. दोन्ही देशांदरम्यान संयुक्त युद्धाभ्यास ‘एक्स-शक्ती 2021’ सोमवारी फ्रान्सच्या प्रेजस या शहरात सुरू झाला. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा सैन्याभ्यास 26 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या युद्धाभ्यासात ‘गोरखा रायफल्स इन्प्रंट्री’ची एक तुकडी भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व करत आहे.
संरक्षण सहकार्य वाढते मागील काही वर्षांमध्ये फ्रान्स, भारताचा एक मोठा संरक्षण सहकारी म्हणून उदयास आला आहे. राफेल व्यवहारामुळे दोन्ही देशांचे संबंध मजबूत झाले आहेत. भारताने मिराज-2000 लढाऊ विमाने देखील फ्रान्सकडूनच खरेदी केली आहेत. दोन्ही देशांनी राजनयाद्वारे संरक्षण सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.