विजापूर येथील घटना- ट्रकची दुचाकीला धडक
वार्ताहर/ विजापूर
ट्रकची दुचाकीला जोराची धडक बसल्याने मुख्याध्यापकांसह शिक्षक जागीच ठार झाले. सदर घटना शनिवार दि. 17 रोजी सायंकाळी 4.30 वाजता राष्ट्रीय महामार्ग 50 वरील हुंडेकर पेट्रोलपंपासमोर घडली. के. एच. हुद्दार (वय 58) व संगनगौडा पाटील (वय 50) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही तालुक्यातील बरटगी सरकारी हायस्कूलमध्ये कार्यरत होते. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
याबाबत समजलेली माहिती अशी, शनिवारी सायंकाळी मुख्याध्यापक हुद्दार व शिक्षक पाटील आपले शाळेतील कामकाज आटोपून दुचाकीने राष्ट्रीय महामार्गावरून परतत होते. ते हुंडेकर पेट्रोलपंपासमोर आले असता समोरून येणाऱया भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात हुद्दार व पाटील हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. या घटनेनंतर घटनास्थळी प्रवाशी व बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळावर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस स्थानकाचे पीएसआय संजय कलूर व सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत शोक व्यक्त करताना शिक्षक इम्तियाज पटेल म्हणाले, मुख्याध्यापक के. एच. हुद्दार व संगनगौडा पाटील हे दोघेही अत्यंत मनमिळावू व उत्कृष्ट शिक्षक होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने मुलांचे मोठे नुकसान होणार असून ही न भरून निघणारी पोकळी असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची नोंद वाहतूक पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास