देवीला घातले गाऱहाणे
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे यंदा भुवनेश्वरी उत्सव रद्द करण्यात आला आहे. तथापि भुवनेश्वरी महिला समितीने सांख्येतिक रित्या हा उत्सव साधेपणाने साजरा केला. राणी चन्नम्मानगर येथील महालक्ष्मी मंदिराच्या आवारात भुवनेश्वरीची रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली. यानंतर महिलांनी भक्तीगीते व देश भक्तीगीते सादर केली.
कोरोना आणि अवेळी पडणाऱया पावसापासून सर्वांचे रक्षण कर असे गाऱहाणे देवीला घालण्यात आले. रत्ना बेल्लद यांनी स्वागत केले. शांता हेगडे यांनी जगन्माते सर्वांचे कल्याण कर, भयमुक्त कर अशी प्रार्थना केली. ज्योती बदामी यांनी आभार मानले. मंदिराच्या व्यवस्थापिका राधिका मिरजी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला.