प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील भोस्ते येथील जलालशहा क्रिकेट क्लबच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत सुरज नाईन संघाने विजेतेपद पटकावले तर जलालशहा भोस्ते संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत 30 संघांनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या संघास 11111 रूपये व उपविजेत्यास 7777 रूपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुरज नाईनच्या फिरोज तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून यास सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी नगरसेवक अजय माने, ग्रामपंचायत सदस्य जुबेर कालवेकर आदी उपस्थित होते.