वृत्तसंस्था/ नॉर्विच
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या चुरशीच्या सामन्यात पोर्तुगालचा हुकमी स्ट्रायकर ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या पेनल्टीवरील एकमेव निर्णायक गोलाच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने नॉर्विच सिटीचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
रोनाल्डोने या सामन्यात 75 व्या मिनिटाला पेनल्टीवर हा गोल नोंदविला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात मँचेस्टर युनायटेडने 16 सामन्यांतून 27 गुणांसह पाचवे स्थान मिळविले आहे. वेस्टहॅम युनायटेडने सरस गोल सरासरीच्या जोरावर या स्पर्धेत चौथे स्थान मिळविले आहे. नॉर्विच सिटी 10 गुणांसह तळाच्या स्थानावर आहे.