आठ जण झाले कोरोनामुक्त, रात्री दोन जणांचे रिपोर्ट आले कोरोना बाधित
प्रतिनिधी/ सातारा
वाई तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मंगळवार हा वाई तालुकावासियांकरता आनंददायी ठरला. वाई तालुक्यात तब्बल आठ जण कोरोनामुक्त झाले आहे. वाई शहरातीलही धर्मपुरी येथील आरोग्य कर्मचारी युवक ठणठणीत बरा झाला आहे. त्यांचे स्वागत गुलाब फुल देवून करण्यात आले. वाईमध्ये नव्याने दोन रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये एक व्याजवाडी येथील तर दुसरा पाचवड येथील आहे. व्याजवाडीचा रुग्ण हा मुंबईवरुन आलेल्यास पंधरा दिवस उलटून गेले. घरातच होम कोरोनटाईन झाले होते. कालावधी पुर्ण झाल्यानंतर अनेकांच्या संपर्कात आल्याने व्याजवाडीकर चिंतेत आहेत.
वाई तालुक्यात कोरोना हा मुंबईवरुन आयात झाला.त्यामध्ये जांभळी, आसले, आसरे या गावांनी आघाडी घेतली होती. सोमवारी सायंकाळी उशीरा वाईकरांसाठी महत्वाचा दिवस ठरला. तब्बल आठ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नव्याने दोन रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. वाई शहरातील धर्मपूरीतील तो आरोग्य सेवक कोरोनामुक्त झाल्याने त्यांचे गुलाब फुल देवून स्वागत करण्यात आले. वाई शहर कोरोनामुक्त होत आहे. तर वाई तालुक्यात तब्बल आठजण कोरोनामुक्त झाल्याने वाई तालुक्यासाठी आनंददायी मंगळवार ठरला आहे. दरम्यान, वाई तालुक्यात नव्याने दोन रुग्ण आढळून आले. व्याजवाडी येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुंबईहून संबंधित व्यक्ती आली आहे. ती घरातच कोरोनटाईन झाली होती. मुंबइं&त निगेटीव्ह होती परंतु येतानाही ठणठणीत होती. घरात कोरोनटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गावातल्यांच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे व्याजवाडीकर भयभीत झाले आहेत. प्रशासनाने गाव सील केले असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील यादव यांनी ग्रामस्थांना आधार दिला आहे. नियम पाळा सगळे काही सुस्थितीत होईल, असे सांगितले आहे. तसेच गावात कोणाला काही लक्षणे आढळून आल्यास लगेच रुग्णालयाशी संपर्क साधा, असे आवाहन केले आहे.