मंगळूर/प्रतिनिधी
मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (एमआयए) च्या कस्टम अधिकाऱ्यांनी दुबईहून शहरात आलेल्या एका प्रवाशाकडून ३०.७३ लाख रुपये किमतीचे ६४७ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे.
केरळमधील कासारगोड येथील रहिवासी इब्राहिम पना लाम अब्दुल्ला हे गुरुवारी सायंकाळी उशिरा दुबईहून स्पाइसजेट विमानाने दाखल झाले. सीमाशुल्क उपायुक्त अविनाश किरण रोंगाली आयआरएस यांच्या नेतृत्वात असलेल्या एका पाळत ठेव पथकाने प्रवाश्याला रोखले आणि त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे कपड्यात लपविलेले सोने सापडले.
पाळत ठेवणे आणि पकडण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पथकातील अधीक्षक सतीश आणि श्रीकांत यांनी पार पाडली. कायद्यानुसार पुढील तपास आणि कार्यवाही सुरू आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.