बेंगळूर : लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी मोडली असून राज्यातील श्रीमंत मंदिरांच्या देणगी पेटींवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे देवदर्शनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांकडून मंदिरांना वेगवेगळय़ा स्वरुपात देण्यात येणाऱया देणग्याही बंद झाल्या आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गत दोन महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरात भाविक नसल्याने देणगी पेटय़ाही रिकाम्या आहेत. गतवर्षी लॉकडाऊनमुळे धर्मादाय खात्याला सुमारे 600 कोटींचे नुकसान झाले होते. यंदाही हीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.
Previous Articleआगामी निवडणुकांची आतापासूनच तयारी
Next Article डी. के. शिवकुमारांमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ
Related Posts
Add A Comment