प्रमुख मंदिरे भाविकांसाठी खुली : दर्शनासाठी जाणाऱया भक्तांचा ओघ वाढला
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील मुख्य नऊ मंदिरांसह इतर सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे दर्शनासाठी भक्तांचा ओघ वाढला आहे. सौंदत्ती श्री रेणुकादेवी मंदिरसह इतर मंदिरे खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने बसेसही सुसाट धावताना दिसत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. याबरोबरच मंदिरेही भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्याचा आदेश बजावला आहे. त्यामुळे रेणुकादेवी सौंदत्ती, श्री वीरभदेश्वर मंदिर गोडची, मायाक्का देवी मंदिर चिंचली, दत्त देवस्थान पंतबाळेकुंद्री, कोकटनूर येथील रेणुका यल्लम्मा देवस्थान यासह इतर मंदिरे खुली झाल्याने मंदिरांकडे धावणाऱया बसफेऱयाही वाढल्या
आहेत.
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे भक्तांची वाहतूक करणाऱया बससेवेवरही परिणाम झाला होता. दरम्यान, सौंदत्ती रेणुकादेवी यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे परिवहनला तब्बल 20 लाखांचा फटका बसला. यासह इतर मंदिरे बंद राहिल्याने बससेवेवर परिणाम झाला होता. मात्र, आता जिल्हय़ातील प्रमुख मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आल्याने दर्शनासाठी जाणाऱया भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बेळगाव-सौंदत्ती बसफेऱयाही वाढल्या आहेत.
मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानकात बेळगाव-सौंदत्ती बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. मागील काही दिवसांपासून मंदिर बंद राहिल्याने भक्तांना देवीचे दर्शन झाले नव्हते. मात्र, मंदिर खुले करताच मंगळवारी सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱया भाविकांची संख्या वाढली होती. याबरोबरच जिल्हय़ातील इतर प्रमुख मंदिरांकडे दर्शनासाठी जाणाऱया भाविकांची वर्दळ होती. त्यामुळे बसफेऱयाही वाढल्या होत्या.