प्रतिनिधी/ बेळगाव
मच्छे गावाजवळील लोटस बारजवळ असलेल्या पानपट्टीच्या शेजारी एका अनोळखीचा मृत्यू झाला असून त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सदर व्यक्तीचा मृत्यू सोमवार दि. 23 रोजी रात्री 11 पासून मंगळवारी पहाटेपर्यंत झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी सकाळी 7 वाजता सदर मृतदेह आढळून आला. तो अशक्त असून अतिमद्यप्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर व्यक्तीची उंची 4.8 फुट, रंगाने गहूवर्णीय, अंगाने सडपातळ, त्याने आंगावर चॉकलेटी कलरचे हाफ शर्ट तर निळय़ा रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. त्याच्या डोक्मयावर 1 इंच काळे पांढरे केस आहेत. तरी सदर व्यक्ती विषयी कोणाला माहिती मिळाल्यास बेळगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे..