वार्ताहर/ मजगाव
मजगाव येथे दि. 9 रोजी भात किडीवरील नियंत्रणासाठी शेतकऱयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मजगाव परिसरातील शेतवडीमध्ये मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भ्घत पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग बेळगाव येथील अधिकारी तांत्रिक व्यवस्थापक आर. एन. भट्ट व त्यांचे सहकारी सकाळी 10 वाजता मजगाव श्री ब्रम्हदेव मंगल कार्यालयात शेतकऱयांना मार्गदर्शन करणार आहेत.
तरी परिसरातील सर्व शेतकऱयांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे मजगावचे कृषी संघटक नेमू पाटील यांनी कळविले आहे.