मजगाव : मजगाव येथील युवकांच्यावतीने सोमवार दि. 14 रोजी श्री ब्रम्हदेव मंगल कार्यालयात 210 नागरिकांना कोव्हीशिल्डचा प्रथम डोस देण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला.
गावातील युवावर्गाने परिश्रम घेऊन गल्लोगल्ली जनजागृती करून लस घेण्याचे आवाहन केले होते. सोमवारी सकाळीपासूनच नागरिकांनी रांग लावून सामाजिक अंतर ठेवून मास्कचा वापर करून शिस्तबद्धरित्या 210 नागरिकांनी कोव्हीशिल्ड लसीकरण करवून घेतले. यासाठी गावातील युवक दीपक सातगौडा, संदीप नरसगौडा, श्रीशैल कालीबाग, सचिन वाडेकर, संजू कोलकार, शितल उपाध्ये, मंदाकिनी नाईक, शांतीनाथ नेगीनहाळ, रवी कोलकार आदींनी परिश्रम घेतले.