शॅडो कौन्सिलने पुन्हा वेधले लक्ष, इमारतींना असलेला आगीचा धोका अधोरेखित
प्रतिनिधी /मडगाव
शॅडो कौन्सिल फॉर मडगावने सप्टेंबर, 2018 मध्ये मडगाव शहरातील जवळजवळ प्रत्येक सरकारी इमारतीला आग लागण्याचा धोका अधोरेखित केला होता आणि शहरातील सर्व सरकारी/सार्वजनिक कार्यालयांच्या तातडीने फायर ऑडिटची गरज व्यक्त केली होती. मडगाव पालिकेच्या इमारतीसह प्रत्येक सरकारी इमारतीला आगीचा गंभीर धोका आहे. त्यामुळे शहरातील विविध कार्यालयांतील मालमत्तांचे आणि महत्त्वाच्या नोंदींचे गंभीर नुकसान होण्याची शक्मयता आहे. कारण कोणतीही अग्निशामक उपकरणे आणि प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण नसल्याने आगीची कोणतीही घटना घडल्यास संपूर्ण कार्यालयासह महत्त्वाच्या नोंदी राख होण्यास वेळ लागणार नाही, हे पुन्हा एकदा शॅडो कौन्सिलने नजरेस आणून दिले आहे.
सर्व व्यावसायिक आस्थापनांना अग्निशामक विभागाकडून ना हरकत दाखल? घेणे बंधनकारक करणाऱया मडगाव पालिकेने हे लक्षात घेतले पाहिजे की, अग्निशमन क्षमतेचा विचार करता त्यांचा स्वतःचा परिसर देखील असुरक्षित आहे आणि कागदपत्रे तसेच फायली अस्ताव्यस्त पडून असल्याने आग लागण्याची एखादी घटना घडल्यास पालिकेच्या इमारतीसाठी ती विनाशकारी ठरू शकते. इमारतीमध्ये लाकडी फ्लोअरिंगसह जी सर्व सामग्री आहे ती अत्यंत ज्वलनशील आहे, याकडे त्यांच्याकडून लक्ष वेधण्यात आले आहे.
आम्ही हा मुद्दा अधोरेखित केल्यानंतर, मडगाव पालिकेने ऑक्टोबर, 2019 मधील आपल्या एका बैठकीत फायर ऑडिट करण्याचा ठराव घेतला होता. दुर्दैवाने, नेहमीप्रमाणे हा ठराव केवळ फाईलपुरताच मर्यादित राहिला, याबद्दल शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील सर्व सरकारी/सार्वजनिक कार्यालयांचे फायर ऑडिट करणे अनिवार्य करावे यासाठी त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱयांनाही आवाहन करण्यात आले आहे. फायर ऑडिट हे केवळ आवश्यक अग्निसुरक्षा तरतुदी व उपकरणेच सांगणार नाही, तर आग नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ उपाययोजनांबद्दल कर्मचाऱयांना त्याअंतर्गत आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. यापूर्वी सरकारी व सार्वजनिक कार्यालयामध्ये आगीच्या घटना अनुभवल्या गेल्या असून कित्येक वेळा बहुतांश मालमत्ता तसेच महत्त्वाचे दस्तऐवज खाक झाल्याचे पाहिले गेले आहे. त्यामुळे हे फायर ऑडिट अत्यंत गरजेचे असल्याचे शॅडो कौन्सिलने म्हटले आहे.