पालिका, नगरसेवकांकडून स्वतःचे कामगार वापरून काम
प्रतिनिधी / मडगाव
यंद मडगाव पालिकेने मान्सनपूर्व कामे वेळेत केल्याने वादळी पावसात मडगावात पाणी साचून राहण्याचे प्रकार घडले नाहीत. बहुतेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असली, तरी पालिका व नगरसेवकांनी स्वतःचे कामगार वापरून हे अडथळे दूर केले असल्याची माहिती मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दिली.
पालिकेच्या अधिकाऱयांसह सासष्टी मामलेदारांनी कोसळलेली झाडे हटविण्यासाठी मोहीम आखली. त्यामुळे अडथळे दूर करणे शक्मय झाले, असे यावेळी सांगण्यात आले. मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी मान्सून जवळ आल्याने नागरिकांना वीजतारांवर किंवा त्यांच्या घरांवर असलेल्या झाडांच्या फांद्या स्वतःहून छाटण्याची विनंती केली आहे. प्रत्येकाने पालिकेकडून अपेक्षा न करता आपला जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी शक्मय असलेल्या झाडांची आवश्यक छाटणी करावी, असे त्यांनी सांगितले.
नवे नगरसेवक खरोखरच चांगले आहेत. कारण रविवारी चक्रीवादळ आले तेव्हा पालिकेच्या रोड गँगचा सुट्टीचा दिवस होता. त्यातच कनेक्टिव्हिटी नसल्याने बऱयाच अभियंत्यांशी आणि पर्यवेक्षकांशी मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. तरीही आपण नगरसेवकांच्या मदतीने व्यवस्थित कामे करू शकलो. नगरसेवकांनी या आपत्तीच्या काळात स्वतःच्या संसाधनांचा वापर करून अडथळे हटविण्यासाठी चांगले प्रयत्न केले व त्यांचे सहकार्य घेतल्याबद्दल आपल्याला आनंद झाला, असे मुख्याधिकाऱयांनी नजरेस आणून दिले.
आपल्याकडे आलेल्या लोकांच्या बहुतांश तक्रारी संबंधित स्थानिक नगरसेवकांकडे पाठविण्यात आल्या आणि बऱयाच जणांनी स्वतःचे कामगार राबवून, तर काहींनी पालिकेच्या कर्मचाऱयांची मदत घेऊन कामे केली, असे फर्नांडिस यांनी सांगितले.