प्रतिनिधी/ बेळगाव
दरवषी सप्टेंबर महिन्यात मतदार यादीची दुरुस्ती करून ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध करण्यात येते. वर्षभरात मतदारांच्या नावात झालेले बदल, मृत मतदारांचे नाव कमी करणे, नवीन नाव दाखल करणे अशी प्रक्रिया राबून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाते. मतदारयादी तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असून रविवारी सुटीच्या दिवशीही मनपाच्या निवडणूक विभागात कामकाज सुरू होते.
कोरोना विषाणूंचा प्रसार झाल्याने महापालिकेचे कामकाज रखडले होते. मनपाच्या सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱयांवर कोरोना विषाणूंच्या नियंत्रणाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे जनगणती व मतदार यादी तयार करणे, महापालिकेच्या वॉर्डरचनेचे काम रखडले होते. राज्य शासनासह मनपा प्रशासन कोरोना नियंत्रणाच्या कामात गुंतल्याने सरकारी कामकाज ठप्प झाले होते. मात्र क्वारंटाईन डय़ुटी आणि अन्य कामाच्या जबाबदाऱया कमी झाल्या आहेत. सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्याचे आदेश शासनाने बजावले आहेत. त्यामुळे मनपाच्या कामकाजाला प्रारंभ झाला आहे. सध्या पावसामुळे घरे पडल्याने सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मतदारयादी दुरुस्तीचे कामही सुरू झाले आहे. सप्टेंबर महिन्यात मतदार यादीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येते. बीएलओ आणि महापालिकेच्या महसूल निरीक्षकांवर मतदारयादी सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात येते. याबाबत कामकाज सुरू करण्यासाठी रविवारी मनपाच्या निवडणूक विभागात महसूल निरीक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. लवकरच बीएलओंची बैठक घेऊन मतदारयादी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याची सूचना देण्यात येणार आहे. रविवारी सुटीच्या दिवशी निवडणूक विभागाचे कामकाज सुरू होते. महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर व कौन्सिल सेपेटरी एफ. बी. पिरजादे यांनी महसूल निरीक्षकांना विविध सूचना केल्या. येत्या दोन दिवसात मतदार यादीचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.