प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेच्या 58 वार्डांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शुक्रवारी सायंकाळी मतमोजणी केंद्राला भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
शुक्रवारी सायंकाळी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतयंत्रे बी. के. मॉडेल हायस्कूलकडे पाठविण्यात आले. याच ठिकाणी सोमवार दि. 6 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असून या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकाऱयांनी तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी पालिका आयुक्त रुदेश घाळी यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते.