नवी दिल्ली
दिल्ली आणि एनसीआर भागात दुधाचा पुरवठा करणाऱया मदर डेअरी कंपनीने ब्रेडच्या उत्पादनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नजीकच्या काळात कंपनीने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी योजना आखली आहे. सध्याच्या काळातील उलाढालीत दुप्पट वाढ करण्याचा इरादा कंपनीने केला आहे. मदर डेअरीने सँडविच बेड, ब्राऊन ब्रेड आणि प्रूट अँड मिल्क ब्रेड अशा प्रकारातले ब्रेड बाजारात उपलब्ध केले आहेत. या विविध ब्रेडस्ची किंमत 15 ते 40 रुपये इतकी असणार आहे. सध्याला एनसीआर भागात मोठय़ा प्रमाणात ब्रेडची उपलब्धता करण्यात येणार आहे.