बेंगळूर : मधमाश्यांसाठी विशेष खोकी बनवून त्यांच्यापासून मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष रोखता येऊ शकतो, अशी माहिती केंद्र सरकारच्या खादी व ग्रामोद्योग विकास आयोगाचे मानद अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी दिली आहे. कोडगू जिल्हय़ातील पोन्नंपेठ येथील वन महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीच्या टप्प्यात हत्तींकडून अधिक प्रमाणात नुकसान होणाऱया वनभागात मधमाश्यांची खोकी असणारे कुंपण निर्माण करण्याचे अनोखे तंत्र अवलंबण्यात येणार आहे. कोडगू जिल्हय़ातील चेळूर गावच्या आजुबाजूला चार ठिकाणे प्रायोगिक तत्वावर निवडण्यात आले असून ही योजना तेथे राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Trending
- गांधीनगरात दिवसाढवळ्या घरफोडी ,रोख रक्कमेसह नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास
- पाण्यासाठी ‘भिवपाची गरज ना’!
- वाहतूक नियमभंग करणाऱ्या 1717 जणांना दिली चलने
- दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
- शिवरायांच्या राज्यात अन्याय, अत्याचाराला थारा नव्हता !
- ‘संजीवनी’ संदर्भात धोरण स्पष्ट करावे
- फोंडा शहरात कपड्याच्या दुकानाला भिषण आग
- पावसाच्या दिरंगाईमुळे सत्तरीतील नद्या सुकल्या