ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी सर्व मंत्र्यांसोबत व्हिडिओच्या माध्यमातून संवाद केला. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी आपल्या तीन महिन्यापर्यंतच्या पगारातील 30 टक्के भाग रिलीफ फंडात दान करण्याबाबत चर्चा केली तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि मास्क घालण्याबाबत देखील चर्चा केली.

शिवराज व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये म्हणाले की, आम्ही 1-31 जुलैपर्यंत एक कोविड अभियान चालवले, त्यात मोठ्या प्रमाणात परीक्षण केले गेेले होते. या अभियानाचा दुसरा टप्पा 1 ते 14 ऑगस्ट या कालावधीत चालवले जाणार आहे. त्यात आम्ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि मास्क घालण्याचा संकल्प करणार आहोत.
पुढे ते म्हणाले, या कालावधीत मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि अन्य जनप्रतिनिधी सार्वजनिक रेल्वे, आधार कार्यक्रम, भूमिपूजन, उद्घाटन आणि अन्य कार्यक्रमांमध्ये तसेच ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकं जमा होतील अशा ठिकाणी सहभागी होणार नाहीत. यासारखे सर्व कार्यक्रम निषिद्ध असतील. अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.