कंत्राटदार जास्त दर मागत असल्याने घेतला निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरात भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने शहरवासियांना उपद्रव होत आहे. भटक्मया कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी कंत्राटदाराकडून प्रतिसाद मिळत नसल्याने यापुढे महापालिकेकडून नसबंदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱयांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी श्रीनगर येथे एबीसी ऑपरेशन थिएटर उभारण्यात येत आहे.
भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी बसवाण गल्ली शहापूर परिसरात तीन नागरिकांवर भटक्मया कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कोणती उपाययोजना राबविणार? याबाबत मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्याकडे विचारणा केली असता, महापालिकेकडून नसबंदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. पण निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच कंत्राटदार मोठय़ा प्रमाणात दर मागत आहेत. त्यामुळे नसबंदीचा उपक्रम महापालिकेकडून राबविण्यात येणार असल्याचे डॉ. संजय डुमगोळ यांनी सांगितले.
याबाबत जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत मनपा अधिकारी आणि पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱयांची बैठक झाली आहे. तसेच याबाबत चर्चा करून हा उपक्रम पशुवैद्यकीय अधिकाऱयांच्या सहकार्याने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता श्रीनगर येथे एबीसी ऑपरेशन थिएटर उभारणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून लवकरच ही मोहीम राबविण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱयांकरवी कुत्री पकडण्याची मोहीम आठवडय़ातून दोनवेळा राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.