प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेचे शहर अभियंते गंगाधर ई. हे महापालिकेच्या सेवेतून बुधवारी निवृत्त झाले. यानिमित्त महापालिका आणि मनपा नोकर संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. त्यांच्या सेवेबद्दल महापालिका आयुक्तांनी गौरवोद्गार काढले व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
शहर अभियंते गंगाधर ई. हे 2019 मध्ये रूजू झाले होते. यापूर्वी विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली होती. बेळगाव महापालिकेत रूजू झाल्यानंतर शहर अभियंते म्हणून सेवा बजावताना विविध विकासकामांना प्राधान्य दिले तसेच महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम व्यवस्थित करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर मागील वषी त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परराज्यातून येणाऱया परप्रांतियांना तसेच गोवा, महाराष्ट्र राज्यातून येणाऱया नागरिकांना क्वारंटाईन करणे अशा विविध जाबाबदाऱया कोरोना कालावधीत पार पाडल्या. दि. 30 जून रोजी ते महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले.
यानिमित्त महापालिका आयुक्त जगदीश के. एच. व अधिकाऱयांच्या उपस्थितीत फल-पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापालिकेच्या कर्मचारी संघटनेतर्फे व सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, व नगर योजना विभाग अशा विविध विभागाच्यावतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, नोकर संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन गुंडपण्णावर, महसूल उपायुक्त एस. बी. दोडगौडर, सामान्य प्रशासन उपायुक्त कंठी, कौन्सिल सेपेटरी आदींसह मनपाचे अभियंते व विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.