प्रतिनिधी /निपाणी
ममदापूर के. एल. येथे सरलष्कर सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीकांत पुजारी यांनी स्वागत केले.
यावेळी श्रीमंत दादाराजे निपाणकर यांनी दीपस्तंभाचे पूजन केले. शरद पुजारी यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर सामूहिक आरती करण्यात आली. सुहास कांबळे यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. भाविकांनी प्रज्वलित केलेल्या हजारो दीपांनी मंदिर परिसर उजळून गेला होता.
यावेळी श्रीमंत धनदीपराजे निपाणकर, श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर, श्रीमंत सम राजलक्ष्मीराजे निपाणकर, सुकिर्तीराजे निपाणकर, दिव्य लक्ष्मीराजे निपाणकर, राजकुंवर निपाणकर, राजकुमारी ऋतंबराराजे निपाणकर, सुरेश पुजारी, ओमकार पुजारी, प्रसाद पुजारी, प्रमोद पुजारी, भरत पुजारी, शंकर पाटील, शीतल कमते, प्रकाश कदम, अनिल कमते, प्रकाश पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते.