प्रतिनिधी /म्हापसा
मयडा पंचायत क्षेत्रात खांब्यावर असलेल्या स्ट्रीट लाईट या भागात पेटत नसल्याने त्या त्वरित दुरुस्त कराव्यात. रात्रीच्यावेळी वॉर्ड क्रमांक 2, 3, 6 व 7 मध्ये या चार वॉर्डमध्ये एलईडी लाईट अद्याप पेटत नसल्याने मयडा पंचायतीचे पंच सदस्य महेश विठू साटेलकर यांच्या नेतृत्वाखाली पंच सदस्यांनी या एलईडी लाईट दुरुस्त करून त्वरित घालाव्यात अशी मागणी करणारे लेखी निवेदन म्हापसा वीज खात्याचे सहाय्यक वीज अभियंत्यांनी दिले आहे.
या निवेदनावर पंच सुर्याकांत भाटलीकर, पूजा संतोष च्यारी, संतोष च्यारी व येथील ग्रामस्थांच्या सह्या आहेत. त्यांनी निवेदनात म्हटल्याप्रमाणे या चारही वॉर्डमध्ये एलईडी खांब्यावर लाईट पेटत नसून त्या लाईट अद्याप पेटत नाही. ज्या लाईट आहे त्या पूर्वीच्या असून त्याच्या फ्रेमही इतरत्र लागत नाही. याबाबत अनेकदा स्थानिक वीज खात्याकडे तक्रार नोंदवूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. या वीज एलईडी लाईट त्वरित घालाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
सध्या ज्या टय़ुबलाईट आहेत त्या पेटत नाही ते रिपेअर करण्यास गेल्यास ते होत नाही. आम्हाला एलईडी लाईट द्याव्यात अशी मागणी केली आहे. कारण आम्हाला चार पाच हजार खर्च करण्यास होत नाही. वीज खात्याकडे गेल्यास ते मटेरियल नाही असे सांगतात. असे झाल्यास आम्हाला लाईट देणार कोण हा प्रश्न आहे. या लाईट चतुर्थीपूर्वी द्याव्या असे ते म्हणाले. आमदारांनी सर्वांना एलईडी देणार असे सांगितले होते. त्यानुसार पंचायत पर्यंत आम्ही सर्वेक्षण करून आमदारांना सांगितले मात्र आजपर्यंत येथे काहीच झाले नाही. आज चार वर्षे झाली आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून आम्ही लाईट घालत आहोत. येणाऱया काळात त्या दुरुस्तीही होणार नाहीत. सरकारने याकडे लक्ष घालावे.
आमदार मंजूर झालेली कामे कधी पूर्णत्वाकडे नेणार
आज जी हळदोण्यात विकास कामे झाली आहेत ती पंचायत सदस्यामार्फत झालेली आहे. ठराव घेऊन पंचायत सदस्यांच्या प्रयत्नाने ही कामे झालेली आहेत. 30 कामे अद्याप बाकी आहे असे आमदार ग्लेन टिकलो सांगत आहेत ती कधी करावी, कुणासाठी ते थांबले आहेत. ही कामे पूर्वीच होणे गरजेचे आहे. पोबुर्फा स्मशानभूमी आहे तीथे कामाची मंजुरी एक वर्षापूर्वी झाली आहे मात्र आज वर्ष उलटले तरी आमदार काम करीत नाही. काम अद्याप सुरू होत नाही तर 30 कामे कधी होणार. आज आपण कामे करणार असे आमदार सांगत असले तरी आपल्यास वाटत नाही आमदार ती कामे पूर्णत्वाकडे नेण्यास यशस्वी होणार आहेत. अशी माहिती यावेळी मगो नेते महेश साटेलकर यांनी दिली.