प्रतिनिधी /म्हापसा
पावासांव मयडे येथील श्री देवी सातेरी देवस्थानचा अठरावा वर्धापनदिन सोहळा मंगळवार दि. 15 ते शुक्रवार दि. 18 पर्यंत मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे.
यानिमित्त दि. 15 रोजी श्री व सौ. जया जयेश बेळेकर यांच्या यजमानपदाखाली सकाळी 7 वा. गणपती पूजन, श्री सातेरी देवीचा महाभिषेक कुंकुमार्चन द्वारा षोडशोपचार पूजा व सग्रह सातेरी याग, सकाळी 11 वा. पुर्णाहुर्ती, महाआरती, मंत्रपुष्प सामुदायिक प्रार्थना, तीर्थप्रसाद, दु. 12 वा. महाप्रसाद, सायं. 4 वा. श्रीची बॅन्डबाजासहीत पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. तद्नंतर सुहासिनीतर्फे दिपोत्सव पावणी, आरती, तीर्थप्रसाद.
बुधवार दि. 16 रोजी दु. 2 वा. श्री व सौ. सविता श्रीकांत राऊळ यांच्या यजमानपदाखाली सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, रात्री 7 वा. दशावतारी नाटक ‘शाप एक वरदान’ गुरुवार दि. 17 रोजी दु. 2 वा. श्री व सौ. मनिषा मनोहर आमोणकर यांच्या यजमानपदाखाली श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, सायं. 7 वा. कोकणी नाटक ‘मोग म्हाजो तुजो’ शुक्रवार दि. 18 रोजी दु. 2 वा. श्री व सौ. आशा धोंडिबा सुतार यांच्या यजमानपदाखाली श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, सायं. 7 वा. कोकणी नाटक ‘तेंगशेर कावळो घोवाक दुवाळो’ सादर होणार आहे. भाविकांनी उत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान अध्यक्ष सुर्यकांत भाटलेकरतर्फे करण्यात आले आहे.