प्रतिनिधी / सातारा
कोपर्डीच्या ताईवर अत्याचार झाला त्या दिवसापासून सातारा जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पक्ष, गटतट विसरून दि. 3 ऑक्टोबर 2016 ला मोर्चा झाला. राज्यभर 58 मोर्चे झाले. त्यावेळी त्या राज्य सरकारने दिलेले आरक्षण दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने स्थगित केल्याच्या सातारा जिल्ह्यात तीव्र भावना उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मराठा समाजाचे वर्चस्व असले तरीही हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत. जिल्ह्यातील मराठा समनव्यकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हीसीत सहभागी होऊन तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
सरकार विरोधात वातावरण पेटण्याची शक्यता
सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे. याच राजधानी मराठा आरक्षणासाठी 3 ऑक्टोबर 2016 ला न भूतो न भविषती असा मोर्चा सातारकरांनी पाहिला आणि अनुभवला. त्या मोर्चाला कोणाचे नेतृत्व नव्हते. सर्व पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यात अनेक आंदोलने झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलने झाली. अनेकांवर गुन्हे दाखल झाले. बॉम्बे रेस्टोरंट चौकात त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जात असताना मराठा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी परिस्थिती हाताळली होती.
अशा आठवणी असताना आता कुठे चांगले दिवस येणार असे वाटू लागले तोच महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या दोन दिवसांपूर्वी आरक्षणाला स्थगिती मिळाली. नुकतेच अकरावीचे ऍडमिशन सूरु झाले. काहींच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होउ लागला आहे. याच मुद्यावर खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली भूमिका मांडली आहे. तर जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठका सुरू आहेत.शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह झालेल्या व्हीसीत जिल्ह्यातील मराठा समनव्यकांनी आपला सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील उच्च न्यायालयातले याचिकाकर्ते संदीप पोळ, ठोक मोर्चाने विवेकानंद बाबर यांच्यासह समन्वयकानी तीव्र भावना व्यक्त केल्या.
Previous Articleकेंद्रिय अर्थमंत्रालयाच्या कर विभागाकडून सतीश जाधव यांचा गौरव
Next Article त्या मृतदेहाची अद्याप ओळख नाही
Related Posts
Add A Comment