बेळगाव : गणेश चतुर्थीचे औचित्य साधून अनेकांची मोठय़ा प्रमाणात तयार कपडय़ांची खरेदी होते. हे लक्षात घेऊन श्री बालाजी इंटरनॅशनल यांच्यावतीने मराठा मंदिर, गोवावेस येथे रेडिमेड गार्मेंट्स आणि शूजचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
12 ते 18 सप्टेंबर असे सलग 7 दिवस चालणाऱया या प्रदर्शनाला बेळगावकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यामुळेच हे प्रदर्शन 18 तारखेपर्यंत वाढविण्यात आले.
कोविडमुळे गेल्या वर्षभरात बाजारपेठ थंडावली. त्यामुळे अनेक ख्यातनाम ब्रँडेड कंपन्यांनी तयार केलेला माल तसाच पडून राहिला. तो सर्व माल अशा प्रकारचे सेल्स लावून अत्यंत वाजवी दरात देशभरात विकले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेळगावात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. एमआरपीपेक्षा सुमारे 80 टक्क्मयांपर्यंत कमी दरात येथे पुरुषांचे व महिलांचे ब्रँडेड गार्मेंट विकले जात आहेत. त्यामध्ये माँटे कार्लो, ब्लॅकबेरी, किलर, कप्पा, एचआरएक्स, स्पॅलाश फॅशन, युनायटेड कलर्स ऑफ बेनेटोन, डब्ल्यू, ऍक्टिव्ह, चाप्स, इंडिगो नेशन याचबरोबर ली, लॅकॉस्टे, ली कूपर, फ्लाईंग मशीन, पार्क अवेन्यू, पेपे जीन्स, बफेलो, टॉमी हिलफिगर यासारख्या अनेक ब्रँडचे कपडे येथे उपलब्ध आहेत.
एमआरपी 4000 रुपयेपर्यंत असलेले तयार कपडे केवळ 350 ते 550 या दरात विकले जात असून स्पेशल काऊंटरवरील शर्ट्स, ट्राऊजर्स, जीन्स, कुर्ती आदी आयटम्स 650 ते 1000 पर्यंत विकले जात आहेत. फॉर्मल वेअर व पार्टीवेअर मेन्स शूज 1500 ते 2000 रुपयात विकले जात आहेत. सेलचा आजचा शेवटचा दिवस असल्याने ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा. अशी संधी पुन्हा मिळणार नाही, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.