प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या टिळकवाडी येथील मराठी टिचर्स टेनिंग (डीएड) कॉलेजचे नूतन प्राचार्य एम. बी. हुंदरे यांचा सर्व स्टाफच्यावतीने सत्कार करण्यात आला.
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या आदेशानुसार व्यवस्थापन मंडळाने 1 फेब्रुवारी रोजी कॉलेजचे प्राचार्य एम. बी. हुंदरे यांना नियुक्तीपत्र देऊन कॉलेजचा कार्यभार सोपविला. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य एम. बी. हुंदरे म्हणाले, कै. बाबुराव ठाकुर यांनी 1942 साली स्थापन केलेल्या या मराठी टिचर्स टेनिंग कॉलेजला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळी शिक्षणाचा प्रसार नव्हता. कै. बाबुराव ठाकुर, कै. चतुरदास शहा, के. गोविंद वामन हेरेकर या दूरदृष्टी असलेल्या त्रिमूर्तींनी खेडोपाडी प्राथमिक शाळा उभ्या केल्या. या शाळांमधील शिक्षकांची गरज ओळखून मराठी टिचर्स टेनिंग कॉलेजची स्थापना केली. सर्वांच्या साथीने कॉलेजची अव्वल परंपरा यापुढे घेऊन जाऊ, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा. वर्षा महाजन, प्रा. के. ए. हगिदळे, सुरेश नाझरे, कल्लाप्पा परसण्णावर आदी उपस्थित होते.