ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
प्रसिद्ध लक्झरी कार उत्पादक कंपनी ‘मर्सिडीज बेंझ’ने भारतात ‘E 350d’ ही कार लाँच केली आहे.
मर्सिडीजने काही महिन्यापूर्वी या कारचे उत्पादन बंद केले होते. परंतु, आता कंपनीने बीएस 6 मध्ये या कारला अपग्रेड केले आहे. Mercedes-Benz E 350d ही कार ई-क्लासचे टॉप डिझेल व्हेरियंट आहे. या कारमध्ये 3.0 लीटर व्ही 6 डिझेल इंजिन देण्यात आले आहे. इंजिन 282 बीएचपीचे पॉवर आणि 620 एनएमचे टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 9 जी ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत येते. हे जुन्या मॉडेलच्या तुलनेत 20 बीएचपी पॉवर आणि 20 एनएम जास्त टॉर्क जनरेट करते. या कारला 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग पकडण्यासाठी 5 ते 7 सेकंद लागतो.
ही कार भारतात BMW 530d ला जोरदार टक्कर देईल. Mercedes-Benz E 350d ची एक्स शोरूम किंमत 75.29 लाख आहे.