ऑनलाईन टीम/तरुण भारत
पेगॅसस प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष भाजपवर टीका करत आहेत. आता या प्रकरणात आणखी भर पडणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मलाही पेगॅससची ऑफर होती असा धक्कादायक खुलासा केला आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मलाही पेगॅससची ऑफार असल्याचे सांगून मोठा धक्का दिला आहे. ममतांनी 4-5 वर्षांपूर्वी इस्रायलचे गुप्तचर सॉफ्टवेअर पेगाससची सेवा ऑफर करण्यात आली होती, तसेच त्यासाठी त्यांनी 25 कोटी रुपयांची मागणी केली होती असे देखील त्यांनी सांगितले. मात्र त्याचा वापर करणे मान्य नसल्यामुळे त्यांनी ही ऑफर नाकारल्याचे देखील स्पष्ट केले.
ममतांनी NSO ग्रुप, इस्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनीने 4-5 वर्षांपूर्वी आमच्या पोलीस विभागात त्यांचे मशीन विकण्यासाठी आले होते आणि त्यांनी 25 कोटी रुपयांची मागणी केली होती; पण मी ते नाकारले कारण त्याचा राजकीय वापर न्यायाधीश, अधिकारी यांच्या विरोधात केला जाऊ शकतो, जो अमान्य आहे” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.