नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
भारतीय बॅडमिंटन दुहेरीच्या प्रशिक्षकपदी मलेशियाचे टॅन किम हेर यांची 2026 साली होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेपर्यंत नियुक्ती करण्यात आली असून क्रीडा युवजन खात्याने या नियुक्तीला अधिकृत मान्यता दिली आहे.
पुरुष दुहेरीत 24 वर्षीय चिराग शेट्टी आणि सात्वीकसाईराज रनकीरेड्डी भारताचे विविध स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व करतात. चिराग शेट्टी बॅडमिंटन मानांकनात आठव्या स्थानावर आहे. भारताच्या या जोडीला आता मलेशियाचे 50 वर्षीय बॅडमिंटन प्रशिक्षक टॅन किम हेर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 2026 साली होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेपर्यंत हेर आणि भारतीय बॅडमिंटन फेडरेशन यांच्यात हा नवा करार झाला आहे.