वाळपई पालिकेच्या कचरा प्रकल्पातील घटना
वाळपई/ प्रतिनिधी
वाळपई नगरपालिकेच्या 15 दिवसांपूर्वीत उद्घाटन करण्यात आलेल्या आधुनिक कचरा प्रकल्पात काम करताना मशीनमध्ये हात अडल्याने वयोवृद्ध कामगार जखमी झाला. मादी गावकर (58) असे त्या कामगाराचे नाव असून त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. सदर ठिकाणी काम करण्यासाठी कुशल कामगारांची गरज असताना नगरपालिकेने अकुशल कामगारांची नियुक्त केल्याची बाब समोर आली आहे. या अपघातामुळे या प्रकल्पात काम करणाऱया कामगारांच्या सुरक्षितेचा प्रश्न चव्हाटय़ावर आला आहे.
काल मादी गावकर हे या प्रकल्पातील एका मशीनवर काम करीत असताना अचानकपणे त्यांचा उजवा हात मशीनमध्ये अडकला. यामुळे त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली. हात मशीनमध्ये अडकल्यानंतर तो काढण्याचा प्रयत्न तेथील कर्मचाऱयांनी केला. मात्र तो अयशस्वी ठरल्याने वाळपई अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी आलेल्या जवानांनी तत्काळ गावकर यांचा हात मशीनमधून बाहेर काढला. त्यानंतर त्यांच्यावर वाळपई सामाजिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आलेले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
नगरपालिकेचा कचरा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱयात सापडलेला आहे. सदर प्रकल्प उभारताना जोरदारपणे विरोध करण्यात आला होता. मात्र आरोगयमंत्री तथा स्थानिक आमदार विश्वजित राणे यांनी विरोधकांची समजूत काढून सदर प्रकल्प याठिकाणी सुरू केला. गेल्या दहा वर्षापासून हा प्रकल्प सुरू आहे. पंधरा दिवसापूर्वीच गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे 34 लाख रुपये खर्चून या प्रकल्पामध्ये बायो डायजेस्ट ही मशिनरी बसविण्यात आली होती. ही मशीन हाताळण्यासाठी कुशल कामगारांची गरज आहे. मात्र पालिका त्याठिकाणी अकुशल कामगारांकडून काम करून घेत असल्याचे कालच्या अपघातावरून स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. मशीनवर काम करण्यासाठी अकुशल कामगारांना वापरून नगरपालिका त्यांचा जीव धोक्मयात घालत आहे, असा आरोपही काही कामगारांकडून होत आहे. या आधुनिक मशीनवर कशाप्रकारे काम करायला हवे, याचे प्रशिक्षणही संबंधित कामागांराना देण्यात आले नाही. त्यांचे गंभीर परिणाम आता कामगारांवर होऊ लागले आहे.
मशीनवर काम करण्यासाठी सफाई कर्मचारी
सदर ठिकाणी काम करण्यासाठी नगरपालिकेने काही कर्मचाऱयांची नियुक्त केलेली आहे. 34 लाख रुपये खर्च करून ही आधुनिक यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. मात्र काही अकुशल कामगार तेथील मशीनवर काम करीत आहे. सदर मशीनवर काम करण्यासाठी कुशल कामगारांची गरज असते. मात्र नगरपालिकेने सफाई कामगार म्हणून भरती केलेल्या कामगारांची या प्रकल्पांसाठी नियुक्ती केली आहे.
नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱयांची धावपळ
कचरा प्रकल्पावरील मशीनमध्ये कामगाराचा हात अडकला असल्याची माहिती मिळताच नगराध्यक्ष अख्तर शहा, मामलेदार तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी दशरथ गावस व यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी स्थानिक नगरसेवक सर्फराज सय्यद उपस्थित होते. जखमी कामगाराला नगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱयांनी दिले. सदर कामगार हे वयोवृद्ध असून त्यांच्याकडून अशा प्रकारे काम करून घेणे कठीण आहे. यामुळे नगरपालिकेने त्यांच्या कुटुंबाचा विचार करावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे. नगरपालिकेने कामाचे धोरण व्यवस्थितपणे राबविण्याची मागणीही होत आहे. गरज पडल्यास सदर प्रकल्पात काम करणाऱया कामगारांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची मागणी कामगारांनी केली आहे.