अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे आदेश नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर
प्रतिनिधी / शिरोळ
संभाव्य महापुराचा धोका पूरबाधित क्षेत्राला बसू नये यासाठी कर्नाटक सरकारशी सातत्याने बोलणे सुरू आहे. प्रशासनाच्या सर्वच विभागाणी सतर्क राहून काम करावे अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले.
शिरोळ तहसिल कार्यालयात सोमवारी संभाव्य महापूर तसेच कोरोना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी करून प्रशासन सज्ज असल्याची माहिती दिली.
यावेळी मंत्री यड्रावकर म्हणाले की, महापुराच्या काळात काम करणाऱ्या घटकांचे प्राधान्याने कोरोना लसीकरण करण्यात यावे. यापूर्वीची महापुराची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचे आहे. पुरबाधित गावातील नागरिकांचे स्थलांतर पशुधन छावणी अन्न धान्य साठा उपलब्ध करावा, पूर काळात वीज खंडित झाला तरी प्रत्येक ग्रामपंचायतीने जनरेटर व्यवस्था करावी, कोरोना संसर्गकडे दुर्लक्ष करू नका ज्या त्या गावातील तलाठी ग्रामसेवक यासह अन्य अधिकाऱ्यांनी पूर बाधित गावात तळठोकून राहावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या या सर्व प्रशासकीय कामकाजावर नियंत्रन तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी ठेवून खबरदारी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.