फेररचनेनुसार प्रभाग राखीवतेतून बाहेरमात्र काहींना राखीवतेचा फटका
प्रतिनिधी / पणजी
पणजी महापालिका प्रभागांच्या फेररचनेला नव्याने वळण मिळाले असून प्रभागांच्या क्रमवारीत केलेल्या बदलामुळे महापौर उदय मडकईकर यांचा प्रभाग आता राखीवतेतून बाहेर पडला. तथापि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचा भाचा प्रमेय माईणकर यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवून त्यांची गोची करण्यात आली. माजी महापौर यतिन पारेख यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव करण्यात आला. भाजपचे पुंडलिक राऊत, रेखा कांदे यांनाही राखीवतेचा फटका बसला आहे.
पणजी महालिका निवडणूक देखील इतर पालिकांबरोबरच होणार आहे. पणजी महालिकेच्या प्रभागांची तयार केलेली यादी परवा काढून ठेवून नव्याने केवळ प्रभागांच्या क्रमांकांमध्ये फेरबदल करुन सोमवारी नव्याने ती जारी करण्यात आली.
उदय मडकईकर यांना दिलासा
या नव्या यादीत महापौर उदय मडकईकर यांचा प्रभाग 18 वरून 14 करण्यात आला व तो खुला करण्यात आला आहे. त्यामुळे महापौरांना दिलासा मिळाला. मात्र माजी महापौर यतिन पारेख यांचा प्रभाग ओबीसीकरीता राखीव करण्यात आला. माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा प्रभाग क्र. 7 हा ओबीसा करीता राखीव करण्यात आला.
भाजपचे नगरसेवक किशोर शास्त्राr ज्यांनी ताळगाव मतदारसंघातून बाबूशला आव्हान देऊन प्रभागात विजय संपादन केला होता, तो क्रमवारीत 4 वरून 8 पर्यंत नेण्यात आला व तो महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला. भाजपला सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा भाचा आणि भाजपचे गोव्याचे मावळते युवा अध्यक्ष प्रमय माईणकर यांचा प्रभाग महिला ओबीसीकरीता राखीव करण्यात आला आहे.
तर पणजी भाजप माजी गटाध्यक्ष पुंडलिक राऊत देसाई यांचा आल्तिनो येथील 21 क्रमांकाचा प्रभाग आता 15 क्रमांकाचा बनला आहे. तो महिलांसाठी राखीव करण्यात आला. भाजपच्या रेखा कांद्रे यांचा प्रभाग आता 18 क्रमांकाचा झाला आहे. तो ओबीसी महिलांसाठी राखीव करण्यात आला.
पणजीतील प्रभागांच्या राखीवतेतून भाजपमध्ये जोरदार धुसफूस सुरू झाली. मूळ भाजपच्या पदाधिकाऱयांना आता आयत्यावेळी भाजपमध्ये आलेल्यांनी अडचणीत आणले असल्याची भावना पसरली आहे. भाजपच्या अनेक पदाधिकाऱयांनी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे कैफियत मांडली असता आपल्यासही पुनरर्चना करताना विश्वासात घेतलेले नाही, असे त्यांनी सांगितले.
प्रभागांच्या पुनर्रचनेतून मूळ भाजप पदाधिकाऱयांची पूर्णतः गोची झाली आहे. या प्रश्नावरून पक्षात विशेषतः पणजीत भाजपमध्ये घमासान सुरू झाले असून ही क्रमवारी त्वरित बदला अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पणजीतील प्रभागांची रचना पुढीलप्रमाणे.
खुला : 1, 3, 6, 8, 10, 11, 13, 14, 17, 22, 23, 26, 28, 29
ओबीसी : 7, 16, 19, 20, 25
महिलांसाठी राखीव : 4, 5, 9, 15, 21, 27, 30
ओबीसी महिला : 12, 18, 24
एसटी : 2